
मुंबई [ प्रतिनिधी ] मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व महाविर इंटर नॅशनल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वयाच्या पन्नास वर्षा पुढील विविध क्षेत्रात जसे की सामाजिक, अध्यात्मिक , सांप्रदाईक, आरोग्य संवर्धनसेवा, पत्रकारिता, कवी लेखक संपादक इ . .इ .क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. २९ जुन २०२५ नाशिक येथे आयोजित करण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात साहित्यभूषण गावगाडाकार खांदेशभूषण कवी लेखक संपादक तात्यासो. साहेबराव नंदन यांना साहित्य नाट्य कला सेवेसाठी जेष्ठमान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे . पुरस्काराचे स्वरूप शॉल , श्रीफळ, बुके, सन्मानपत्र, स्मृती चिन्ह , व मानाचा फेटा बांधून साहेबराव तात्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तशा आशयाचे निवडपत्र संस्थेच्या संस्थापिका मेघाताई शिंपी व इतर मान्यवरांच्या नामनिर्देश असलेले निवड पत्र प्राप्त झाले आहे. साहेबराव नंदन तात्या मोक्षगंगेच्या काठावरील बागलाण तालुक्यातील ताहाराबादचे मुळ रहिवासी असून उद्योगानिमित्त गंगागोदावरी पंचवटी क्षेत्री नाशिक येथे स्थाईक असून, ते उत्तर महाराष्ट्रात साहित्यसेवा क्षेत्रात लोकप्रिय असून, उत्तम विचाराचे प्रवचनकार, नाट्यलेखक , कवी कादंबरीकार व संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. गावगाडा काव्यसंग्रह , परिसस्पर्श कादंबरी , सगर रत्न अंक , सगर सेवार्थी विशेषांक , सगर दिपोत्सव दिवाळी अंक, स्नेहबंध अंक इ. साहित्य त्यांचे प्रसिद्ध असून त्यांच्या सर्वच साहित्याला विविध संस्थांचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेता त्यांना अनेक संस्थानी सन्मानाने विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे. शेकडो सन्मान पत्रांचे ते मानकरी ठरले आहेत. वयाच्या बासष्ठव्या वर्षी चौथा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याने सगर साहित्यिक परिवार व साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
