
मुंगसरे, नाशिक:-(प्रतिनिधी )अंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जनता विद्यालय मुंगसरे येथे योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी” या विषयावर आधारित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी राबविण्यात आला. के. के. वाघ कृषी महाविद्यालय नाशिक च्या अंतिम वर्षातील विद्यार्थी मयूर रायसिंग, महेशकुमार पाटील, अंगत पाटील, पियुष पवार, ओमकार संधान, अविष्कार संधान आदित्य राजपूत या विद्यार्थ्यांनी मिळून संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, सहकार्य, आणि संचालन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले. योग सत्रात विविध योगासनांचे सादरीकरण करण्यात आले ज्यात सूर्यनमस्कार ताडासन वृक्षासन भुजंगासन आणि श्वसन प्रक्रियेचे महत्त्व विद्यार्थ्यांना शिकवले गेले.

म.वि.प्र. समाजाचे जनता विद्यालय मुंगसरे च्या मुख्याध्यापिका. माधुरी खांडबहाले, उपमुख्याध्यापिका.संजीवनी चव्हाण आणि शिक्षक वर्ग माधुरी वाघ,रोहिणी निफाडे, स्वप्निल बच्छाव, ऋषिकेश संगमनेरे, देखील मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना योगाचे फायदे स्पष्ट केले या कार्यक्रमात सुमारे ६० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक, पालक व स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण,आरोग्यबद्दलची जाण आणि एकत्रित कार्य संस्कृती या सर्व घटकांना चालना मिळाली. के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थिंनी एक पृथ्वी, एक कुटुंब, एक आरोग्य असा संदेश देत या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, सचिव प्रा.के.एस.बंदी, संस्थेचे विश्वस्त अशोक मर्चेंट, चांगदेवराव होळकर, विश्वस्त व प्राचार्य डॉ. के.एन. नांदुरकर, डॉ.एस.एस.साने, शकुंतलाताई वाघ, डॉ.व्ही.एस. माने, एस.जी ठाकरे, डॉ.प्रीती भामरे, व कॅम्पस समन्वयक डॉ.व्ही.एम.सेवलीकर, प्राचार्य डॉ.एस.एस.हाडोळे, प्रा.परमेश्वरी पवार, प्रा.दीपक पाटील, प्रा.ज्योती मोटे, प्रा.सोनोणे यांचे मार्गदर्शन लाभले.
