
नांदगाव (प्रतिनिधी)दिनांक २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय बागुल सर व उपाध्यक्ष सौ.सरिता बागुल मॅम यांच्यातर्फे योग दिनाचे विशेष नियोजन करण्यात आले होते.या वेळी संस्थेचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष,श्री. सार्थक बागुल,स्कुलचेप्रिन्सिपल मिस. वासंती नटराजन मॅम,स्पोर्ट टीचर मिस.मयुरी क्षीरसागर यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. योगा दिनाचे महत्त्व मिस. नेहा मॅम व मिस माया मॅम आणि इ.६ वीची विद्यार्थ्यांनी कु. समृद्धी मोरे या सर्वानी उत्तम रितीने सांगितले. रेनबो स्कूलचे इ.५ वी व ६ वी च्या विद्यार्थ्यांचे सिटीग आणि स्टँडींग आसनाचे विविधांगी प्रकार विद्यार्थ्यानी सादर केले

.लिटिल स्टार स्कुलचे इ.६ वी च्या विद्यार्थ्याचे सिटीग आणि स्टँडींग आसनाचे विविध प्रकार , सूर्य नमस्कार ,प्राणायामाचे प्रकार सादर केले. इ.७ वी च्या विद्यार्थ्यांचा एरोवीक डान्स खूपच सुंदर रित्या सादर केला. विद्यार्थ्यांसोबतच संस्थेचे उपाध्यक्ष सौ. सरिता बागुल मॅम ,श्री. सार्थक बागुल ,स्कुलचे सर्व शिक्षक आणि शिक्षिका ह्या सर्वानी मिळुन उत्तम योगा करून योगाचे महत्त्व प्रात्यक्षिकद्वारा दाखविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिस अनिता जगधने मॅम व मिस गायत्री चव्हाण मॅम यांनी अतिशय सुंदररित्या केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कुलचे प्रिन्सिपल,शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी या सर्वानी अपार मेहनत घेतली.
