
योगा दिनानिमित्त ओझर महाविद्यालयाचे उपस्थित प्राचार्य व प्राध्यापक वर्ग
नाशिक: (प्रतिनिधी) मविप्र समाजाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ओझर मिग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग(D-14) येथे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व सहकारी प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने प्राणायाम व योगासनांचा उत्साहपूर्ण वातावरणात सराव केला. याप्रसंगी प्राचार्यांनी प्राणायाम योगा व व्यायामाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
