
बाणगाव बुद्रुक (प्रतिनिधी )नांदगाव तालुक्यातील मोरझर विकास सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रुक्मिणी चोळके यांची बिनविरोध.मोरझर विकास सेवा सहकारी संस्थेच्या आवर्तनानुसार रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर निवड करण्यासाठी संस्थेच्या सर्व संचालकांची बैठक तालुक्याचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांचे उपस्थितीत पार पडली बैठकीत ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी अध्यक्षपदासाठी सौ. रुक्मिणी संजय चोळके यांना संधी देण्याचे आव्हान केले यावर सर्व संचालकानी सहमती दिल्याने संस्थेच्या अध्यक्षपदी रुक्मिणी चोळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडी प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष सौ.रुक्मिणी चोळके यांचा सत्कार जेष्ट नेते बापुसाहेब कवडे, सरपंच लीना पाटील,शिवसेना नांदगाव शहरप्रमुख सुनील जाधव,नांदगाव कृ.उ.बा.समितीचे संचालक एकनाथ सदगीर,समाधान पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती सुधीर देशमुख,कु.उ.बा समितीचे माजी पुंजाराम जाधव,प्रकाश शिंदे सत्कार केला. सदर निवडी प्रसंगी मोझर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ लिना पाटील.उपाध्यक्ष सुभाष चोळके,संचालक कैलास चोळके,सूर्यभान चोळके,भीमा निकम,वाल्मीक गायके,वसंत चोळके,रमेश पारेकर,श्रावण चोळके आदी संचालक उपस्थित होते. यावेळी तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे,कृउबा माजी,सभापती तेजदादा कवडे,नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद भाबड यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सौ रुक्मिणी चोळके यांचे अभिनंदन केले आहे.कृ.उ.बा.समितीचे संचालक समाधान पाटील यांनी यावेळी आभार मानले.प्रतिक्रिया…..संस्थेचे मार्गदर्शक जेष्ट नेते बापुसाहेब कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालकाना विश्वासात कामकाज करू.संस्थाच्या वसुलीसाठी प्रयत्न करू.रुक्मिणी चोळके – नवनिर्वाचित अध्यक्ष मोरझर विका सोसायटीफोटो ओळनांदगाव -मोरझर विकास सोसायटी अध्यक्षपदी सौ रुक्मिणी चोळके यांची बिनविरोध निवड झाल्यावर सत्कार करताना जेष्ट नेते बापुसाहेब कवडे सरपंच लिना पाटील,कु बा समितीचे संचालक समाधान पाटील,सुधीर देशमुख,सुनील जाधव,एकनाथ सदगीर, पुंजाराम जाधव,आद उपस्थित होते या यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश उगलमुगले व संस्थेचे सचिव शिवाजी लव्हाटे यांनी कामकाज बघितले
