
शिर्डी (प्रतिनिधी )– नाशिक जिल्ह्यातील युवाशक्तीच्या ज्वालामुखी समजले जाणारे, समाजहितासाठी झटणारे आणि युवकांमध्ये जागृती निर्माण करणारे मा. भागवत राजाराम झाल्टे यांना आज शिर्डी येथील शुभारंभ मंगल कार्यालयात एक भव्य हजारोच्या सोहळ्यात “महाराष्ट्र भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला. अनेक ठिकाणी मोरांची अण्णांची पशु प्राण्यांची अनेक वेळेस त्यांना जीवदान दिले आहे संकट काळात निस्वार्थपणे धावून जाणारा व्यक्तिमत्व “युवा क्रांती” संघटनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या मान्यवर उपस्थितीत ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि फुलगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात युवा क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रविंद्र सूर्यवंशी, साहेबांनी विविध जिल्ह्यांचे महाराष्ट्रातून पदाधिकारी, युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मा. भागवत झाल्टे यांची जिल्हाध्यक्ष वरून नुकतीच “उत्तर महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष” पदावर नियुक्ती झाली आहे.

ही निवड त्यांच्या कुशल संघटन कौशल्यामुळे, युवकांशी असलेल्या दृढ नात्यामुळे आणि समाजाच्या प्रत्येक घटकासाठी सातत्याने केलेल्या कार्यामुळे झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली युवा क्रांतीस एक नवी दिशा मिळेल, असा विश्वास संघटनेत व्यक्त होत आहे.सामाजिक न्याय, शिक्षण, बेरोजगारी, ग्रामीण प्रश्न अशा विविध विषयांवर मा. झाल्टे यांनी आजवर गावात नव्हे तालुक्यात नव्हे तर ते संपूर्ण महाराष्ट्र भरत सातत्याने काम करत आहे त्यांनी आपल्या कार्यातून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडत, अनेक तरुणांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेतले आहे.या यशाबद्दल संजय दराडे, उपशहर प्रमुख, शिवसेना मनमाड यांनी मा. भागवत झाल्टे यांचे विशेष अभिनंदन केले. “आपण जसे आतापर्यंत समाजासाठी निःस्वार्थ सेवा केली, तसेच पुढेही अधिक जोमाने कार्य करत राहा, हीच अपेक्षा,” असे त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात नमूद केले महाराष्ट्र भूषण उपस्थितीत मान्यवर मा.कैलास चौधरी साहेब तळोदा नंदुरबार जिल्हा पोलीस उप निरीक्षक देविदास लाड साहेब व इ.प्रमुख उपस्थिती: मा. रविंद्र सूर्यवंशी (राष्ट्रीय अध्यक्ष), राज्य व जिल्हास्तरीय युवा पदाधिकारीमा. भागवत झाल्टे यांचा हा सन्मान नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण ठरला आहे. युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक कार्यास नवी प्रेरणा देईल, अशी प्रतिक्रिया समाजातून उमटत आहे त्याप्रसंगी मा.राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र जी सुर्यवंशी साहेब मा.ह भ प राष्ट्रीय उपाध्यक्ष नानाजी महाराज कापडणीस महाराज प्रदेश अध्यक्ष तथा संचालक मा.ह.भ.प अवचितानंद महाराज राष्ट्रीय युवती अध्यक्षा सौ.जयश्रीताई व सर्व रणरागिणी भगिनी मा. राष्ट्रीय संपर्क प्रमुख शेळके दादा मा.राष्ट्रीय नानासाहेब बडे पाटील आदमाने सर व संचालक मंडळ मा.राजेंद्र हेंद्रे सर सुभाष शेटे सर शिवाजी शेलार सर सर आनंदराव पगार सर श्रीवस्तव सर सर्व जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष व पदाधिकारी सदस्य उपस्थितीत होते
