
नाशिक (प्रतिनिधी )— शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग ही एक नैसर्गिक व प्रभावी पद्धत आहे.जगभर योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो.याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ९च्या वतीने,सविता करण गायकर यांच्या पुढाकारातून,छत्रपती शिवाजीनगर येथील बबन लॉन्समध्ये योग दिनाचा भव्य कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले योग प्रशिक्षक सौ.सीमा ताई पाटील यांचे मार्गदर्शन आणि आमदार सीमा ताई हिरे यांचे प्रेरणादायी विचार.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नेते महेश भाऊ हिरे,सातपूर मंडळ अध्यक्ष नारायण भाऊ जाधव, तसेच ज्योती शिंदे,मनीषा गांगुर्डे, योगिता आवारे आणि प्रियंका गायकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.प्रभागातील अनेक महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.महेश भाऊ हिरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,”आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र,भाजपा सरकार हे राजकारणासोबत जनतेच्या आरोग्याकडेही तेवढ्याच गांभीर्याने पाहत आहे.खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योगाचा अंगीकार करून संपूर्ण देशाला प्रेरणा देतात.त्यामुळेच प्रभागात योगा उपक्रम सातत्याने सुरू राहावा यासाठी आम्ही लवकरच योगा हॉल उभारू.”सविता गायकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,”योग दिन हा महिलांसाठी जागरूकता निर्माण करणारा दिवस आहे.

या माध्यमातून आम्ही महिलांना एकत्र आणून,त्यांच्या धकाधकीच्या जीवनात दररोज एक तास स्वतःसाठी द्यावा याची जाणीव करून देत आहोत. आमदार सीमाताई व महेश भाऊ हिरे यांच्या मदतीने लवकरच योगा हॉल उभारण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन भाजपच्या सामाजिक कार्यकर्त्या सविता करण गायकर,अर्चना संजय तुपलोंढे,अविनाश गायकर आणि प्रीतेश पाटील यांनी केले.
