
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९४४ वा दिवस* चमत्कारांचे, रहस्यांचे वा गुप्त गोष्टींचे वेड आपल्याला नेहमीच खुळे, दुबळे बनवीत असते. ह्यापायी योगासारख्या एका सर्वश्रेष्ठ विज्ञानाचा जवळ जवळ नाश झाला आहे. भारत वर्षात योग विद्या पूर्णत्वास पोहोचावयास आज तब्बल चार हजाराहून अधिक वर्षे होऊन गेली आहेत. तेव्हापासून एका उत्कृष्ट, सुसंबद्ध शास्त्राच्या स्वरूपात तिचा प्रचार आणि प्रसार होत आला आहे. योग म्हणजे जोडणे. अखिल ब्रम्हांडाशी तादात्म्य पावणे. भारतात आम्ही ज्याला ‘योग’ वा एकत्वाची अनुभूती म्हणतो तिच्याच द्वारे धर्माच्या अंतिम लक्ष्याचा लाभ होतो.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १ आषाढ शके १९४७*
★ जेष्ठ वद्य /कृष्ण १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. २२ जून २०२५
★ योगिनी एकादशी 🚩🚩🚩🚩🚩
★ संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा, त्र्यंबकेश्वर ★ १८०५ इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचा जन्मदिन
★ १८९६ मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांचा जन्मदिन.
★ १९९४ महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्यात महिलांना ३० टक्के आरक्षण.
