
मनमाड ( प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाज संचलित आदर्श इंग्लिश मेडिअम स्कूल मनमाड येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती धाञक पी. जी. उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवातीला सहशिक्षिका आहेर एस. आर.यांनी *जागतिक योग दिन* योगाचे ,व्यायामाचे जिवनातील अनन्य साधारण महत्त्व व गरज आहे याबाबत माहिती दिली.

तसेच योग प्रार्थना- श्लोक द्वारे सुरुवात करून योगसाधनेचे ,सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके विद्यार्थीनी अनुष्का गीते,आसावरी राऊत, नम्रता पाटील सह करून घेतले. याप्रसंगी सर्व शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थ्यांनी योगसाधनेत सहभाग घेतला .त्यानंतर ओमकाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.
