
नाशिक: ( वार्ताहर) 21 जून 2025 रोजी पी एम श्री जिल्हा परिषद आदर्श शाळा विल्होळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.योग विद्याधाम अध्यापिका, विना ओतुरकर आणि त्यांचे सहकारीपाथरेकर मॅडम फाळके मॅडम योग प्रात्यक्षिक करण्यासाठी आलेले होते. योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्यक्षिक केले.निरोगी व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. शाळेमार्फत गुलाब पुष्प देऊन योगशिक्षिकांचे आभार प्रदर्शन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री नितीन पवार सुवर्णा पवार सतीश लाड रंजन कासार आशालता फलके संगीता नागपुरे आशा चौधरी पौर्णिमा थोरात रुपाली शिंदे वारुंगसे मॅडम प्रकाश डांगे सर्व शिक्षक, आणि विद्यार्थी उपस्थित होते.
