
नाशिक रोड ( प्रतिनिधी ) संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज पालखीच्या आषाढी वारी दरम्यान _महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा नाशिकरोड_ आयोजित _”काव्यदिंडी-२०२५”_ हे पंढरपूरच्या वारीवरील कवितांचे जिल्हास्तरीय खुले कविसंमेलन होणार आहे. यामध्ये… कवींना केवळ स्वरचित कविता सादर करता येईल. * कविता या पंढरपूरच्या वारीवरील असाव्यात, ही पूर्व अट आहे. * एका कवीला केवळ एकच रचना सादर करता येईल. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लेखिका तथा संतसाहित्य अभ्यासिका श्रीम.कविता गायधनी उपस्थित राहणार आहेत.काव्यदिंडी खुल्या कवी संमेलनात सहभाग घेण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. शाखेच्या कार्यकारिणी सदस्या *श्रीम. अलका अमृतकर (९७३०००७९६९)* यांच्याकडे नावे नोंदवावीत. *कार्यक्रम : काव्यदिंडी-२०२५**दिनांक : शनिवार २८, जून २०२५**वेळ : सायंकाळी ६.०० वाजता**स्थळ : ऋतुरंग सभागृह, दत्त मंदिर चौक, नाशिकरोड.* _काव्यदिंडी कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. त्यास जिल्ह्यातील जास्तीत जास्त कवींनी आणि साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे._
