
वडांगळी(प्रतिनिधी )येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच अभिनव बाल विकास मंदिर वडांगळी ता. सिन्नर या विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सुमारे 1200शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके सादर केली.यावेळी व्यासपीठावर प्रमुख योग गुरु म्हणून करंजगाव तालुका निफाड येथील प्रभाकर अण्णा पवार संचलित संस्कार निकेतन वैदिक पाठशाला येथील योग शिक्षक गौरांग अरविंद पटेल,निष्ठा पाटीदार, स्वराली जाधव,दक्ष बंदरिया विभा मॅडम यांनी विविध योगासने व प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना शिकवली.

यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार, पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक तसेच क्रीडा शिक्षक राजेंद्र गीते, विलासराव गोसावी, प्रशांत पाटील, बाळासाहेब सांगळे, सीमा भामरे, सचिन सानप तसेच सर्व शिक्षकांनी योग साधना केली.
सदर कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार व योग गुरु गौरांग पटेल पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी शंकरराव सांगळे यांनी तसेच मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार सर यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी दररोज विविध योगासने व व्यायाम प्रकार दररोज केले पाहिजे, त्यामुळे शरीर व मन ताजे तावाने होऊन मानसिक स्थिती सुधारण्यास मदत होते. असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योग प्रात्यक्षिके करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
