
नायडोंगरी,(प्रतिनिधी ) नांदगाव तालुक्यातील लोकनेते कै ॲड विजय शिवराम आहेर हायस्कूल व ज्युनियर ( कला व विज्ञान) कॉलेज नायडोंगरी विद्यालयास मुख्यमंत्री – माझी शाळा , सुंदर शाळा स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेच्या मूल्यांकनामध्ये परिसर स्वच्छता, चहू बाजूच्या भिंतींची आकर्षक बोलकी रंग सजावट, परसबाग, वृक्षारोपण, विद्यालयाचे शालेय अभिलेख, संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, मुला – मुलींसाठी स्वतंत्र शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा या सह इतर भौतिक सुविधा विद्यालयाच्या गुणवत्तेचे निकष दिसून येतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी संस्थेच्या माध्यमातून संस्थाप्रमुख विलासभाऊ आहेर यांनी वायफाय ने सुसज्ज अशी डिजिटल क्लासरूम ची निर्मिती करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीची व्यवस्था प्राप्त करून दिली .या पुढेही तंत्रज्ञानावर भर देऊन विद्यालयास संपूर्ण सुविधा देण्यासाठी संस्था आज ही अग्रकमाने तयार आहे. शासनाच्या विद्यार्थी लाभाच्या विविध शिष्यवृत्ती योजना, विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक महोत्सव, विविध विषयांच्या स्पर्धा परीक्षा आदी सर्व निकष विद्यालयाचे अद्यावत असल्याने नांदगाव तालुक्यातील नायडोंगरी सारख्या ग्रामीण भागातील विद्यालयाने मुख्यमंत्री – माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात प्रथम पारितोषिक मिळविले अशी माहिती प्राचार्या सौ पल्लवी आहेर यांनी दिली.या अभियानासाठी नांदगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी , शिक्षण विस्तार अधिकारी व नायडोंगरी बीट चे केंद्रप्रमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मुख्यमंत्री – माझी शाळा , सुंदर शाळा अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या पल्लवी आहेर ,उपमुख्याधपिका सोनगीरे मॅडम, पर्यवेक्षक मवाळ सर संस्थेचे संचालक तथा मुख्य लिपिक बाळासाहेब भोसले आदिसह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक वर्गाने विशेष परिश्रम घेतले. या अभियानात प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल संस्थेचे सरचिटणीस विलासभाऊ आहेर नांदगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले , शिक्षण विस्तार अधिकारी नंदा ठोके ,केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील व प्राचार्या पल्लवी आहेर यांनी अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल परिसरातील नागरिकांनीही विद्यालयाचे कौतुक केले.

नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी विद्यालयाने स्पर्धेत सहभाग घेऊन सर्व घटकांनी परिश्रम घेतले मुख्यमंत्री – माझी शाळा , सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक मिळविला.शिक्षक पदाधिकारी यांची शाळेप्रती असलेली कर्तव्य भावना , वर्षभरात राबविलेले उपक्रम या मुळे ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रेरणा मिळाली भविष्यात जिल्हा पातळीवरील स्पर्धेत भाग घेऊन विद्यालयाच्या प्रगतीत सहभागी होण्याचे आवाहन केले.लवकरच विद्यालय तंत्रज्ञानाने समृद्ध होईल.
श्री.विलासभाऊ आहेर
सरचिटणीस कै शिवराम वेडूजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ नायडोंगरी
