
पिंपरखेड -(प्रतिनिधी )२१जून २०२५ आज रोजी विद्यालयात शासन निर्देशानुसार आंतरराष्ट्रिय योगादिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी नांदगाव येथील प्रसिद्ध योग शिक्षक मा. सोमनाथ दुसाने व योग शिक्षिका सौ. वैशाली दुसाने मॅडम यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना योग व प्राणायामाचे धडे दिले. विद्यार्थ्यांनी अतिशय मनापासून योगसाधनेचा आनंद लुटला. दोन्ही योग शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते.

विद्यार्थ्यांनी त्याच बरोबर त्यांच्या पालकांनी व शिक्षकांनी देखील दररोज सकाळी नियमित योग व प्राणायाम केल्यास त्यांचे आरोग्य सुदृढ राहिल. नानाविध रोगांपासून त्यांचा बचाव होईल. तसेच दवाखान्यातील अवाढव्य खर्च सुद्धा वाचेल असे मत मा. दुसाणे मॅडम व सरांनी व्यक्त केले. विद्यालयाच्या वतीने दोन्ही योग प्रशिक्षकांचे पुष्पगुच्छ, शॉल श्रीफळ देऊन मुख्याध्यापक मा. काशिनाथ गवळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक संजय कांदळकर, श्रीमती अलका शिंदे, कैलास पठाडे, लक्ष्मण जाधव, उत्तम सोनवणे, संदीप मवाळ, आबासाहेब सोनवणे इत्यादींनी परिश्रम घेतले.
