
नांदगाव ( सोमनाथ घोंगाणे) अण्णा आज तुझा जन्मदिवस अण्णांचा वाढदिवस आमच्यासाठी खास असायचा ‘ घरात गोड हसू ‘ आणी भरपूर प्रेम असायचे ‘आणि महत्वाचे म्हणजे आदरयुक्त ( भिती ) दरारा असायचा .अण्णा तुझ्या आदरयुक्त भिती मध्ये आम्ही मोठे झालो .पण आजही तुझ्या आठवणीत आम्ही आधार शोधतोय ‘ पण आम्हाला मोठे करण्यात तू जीवाचे रान केले. आमच्या सुखासाठी तू कधीही आपल्या तब्बेती कडे लक्ष दिले नाही. अण्णा आजही आम्हा परिवाराला तुझा खुप अभिमान आहे . आम्ही आजही तू शिकविलेल्या वाटेवर वाटचाल करीत आहे. व करीत राहू .अण्णा आज तुझा वाढदिवस साजरा करतानां तू आमच्यात नाही. पण डोळयात आसवांचे पाणी आहे. पण मनात खुप अभिमान आहे. कारण तू आमच्या आयूष्यातील एक अमुल्य प्रेरणा आहे. तू जिथे कोठे असशील ‘ तिथे तुझ्या आत्मास शांती आणि समाधान लाभो . तुला विनम्र अभिवादन आणि वाढदिवसाच्या स्मृतीला आदरपुर्वक नमन .श्रीमती सुशीला राजाभाऊ सोनवणे मालेगाव सौ. आशा नंदकुमार गुळवे अंबरनाथ सोमनाथ शिवलिंग घोगांणे श्रीमती सुरेखा उमाकांत घोगांणेनिलेश उमाकांत घोगांणेकांचन मिलींदकुमार सालपे बारामती प्रियंका विनयकुमार सालपे ( U. K )सुरज महेद्रं घोगांणे
