
मखमलाबाद { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर माजी नगरसेवक दामोधर मानकर,पुंडलिकराव खोडे,स्कूल कमिटी सदस्य पोपटराव बोराडे,प्राचार्य संजय डेर्ले,कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मनिषा आहेर,पर्यवेक्षक सुनील पाटील,ज्युनिअर कॉलेज प्रमुख विकास थोरात,ज्येष्ठ शिक्षक प्रताप काळे उपस्थित होते

मखमलाबाद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योगासने करतांना मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे,माजी नगरसेवक पुंडलिकराव खोडे व सर्व मान्यवर,प्राचार्य,पर्यवेक्षक,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी.

.सर्व प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते सर्व पाहुण्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.ज्येष्ठ शिक्षिका योगिता कापडणीस यांनी श्र्लोक घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.योगशिक्षक ॲड.प्रतीक खराटे,योगशिक्षिका पूनम पाटील,योगगुरू ग्रंथपाल सुभाष कोल्हे,ज्येष्ठ क्रीडाशिक्षक अनिल पगार,शरद आहेर,सुनिता उशिर यांच्या मार्गदर्शनाखाली योगासन करण्यास सुरवात करण्यात आली.यामध्ये प्रार्थना,पूरक हालचाली,ताडासन,वृक्षासन, पादहस्तासनं,अर्ध चक्रासन, त्रिकोणासन,दंडासन,भद्रासन, बद्धकोनासन, वज्रासन,अर्ध उष्ट्राशन,शशांकसन,उत्तान मांडूकासनं,वक्रासन,मकरासन, भुजंगासन,शालशासन ,सेतुबंध सर्वांगासन,उत्तान पादासन, अर्धहलासन,पवनमुक्तासन, शवासन,कपालभारती,प्राणायाम, ध्यानधारणा आदी आसने घेण्यात आली.भारतीय प्राचीन संस्कृती,परंपरा यामध्ये योग, योगासने,योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्व आहे.अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी,साधुसंत,यांनी वेळोवेळी योगाचे महत्व व त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे.विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी २१ जून हा दिवस जागतिक योगदिन म्हणून आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास प्राध्यापक,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
