
नांदगाव (मारुती जगधने) राज्यातील अनेक ग्रामीण भागांत सध्या अवैध दारू विक्रीचा विळखा वाढताना दिसत आहे. गावपातळीवर मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू तयार केली जात असून, ती खुलेआम विकली जात आहे. या प्रकारामुळे केवळ आरोग्यावरच नव्हे, तर शासनाच्या महसूलावरही मोठा परिणाम होत आहे.दारूबंदी किंवा परवाना शुल्क टाळण्याचा मार्ग राज्यातील अनेक ठिकाणी कायदेशीर मद्यविक्री केंद्रे आहेत. परंतु या केंद्रांवर शासनाकडून लायसन्स घेणे, कर भरणे व विविध परवाने आवश्यक असतात. त्यामुळे अनेकजण हे नियम टाळून बेकायदेशीर मार्गाने हातभट्टी किंवा स्पिरिटवर बनवलेली दारू तयार करून विक्री करत आहेत.शासनाला लाखो रुपयांचा महसूल तोटा अवैध दारू विक्रीमुळे शासनाला मद्यविक्रीतून मिळणारा लाखो रुपयांचा जीएसटी, एक्साईज ड्युटी आणि परवाना शुल्क यांचा महसूल मिळत नाही. याचा थेट फटका राज्याच्या आर्थिक उत्पन्नावर बसतो आहे.आरोग्यावर गंभीर परिणाम हातभट्टी दारूमध्ये अनेकदा अपायकारक रसायने मिसळली जातात. त्यामुळे त्याच्या सेवनाने नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. दरवर्षी अशा अवैध दारूमुळे अनेकांना जीव गमवावा लागतो.पोलीस आणि प्रशासनाचे दुर्लक्ष?काही ठिकाणी पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाचीही या अवैध दारू विक्रेत्यांशी संगनमत असल्याचे आरोप ग्रामस्थ करत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
काय उपाययोजना करणे आवश्यक आहे?गावागावांमध्ये गुप्तचर यंत्रणा सक्रिय करणेअवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे दारूबाबत जनजागृती अभियान राबवणे कायदेशीर मद्यविक्री प्रणाली अधिक पारदर्शक व किफायतशीर बनवणे नाशिक दिंडोरी तालुक्यात महिलांनी एक्साईज विभागाच्या कार्यालयावरती मोर्चा काढून गावात होणाऱ्या वैद्य दारू विक्री बंद करण्याची मागणी केली त्याचप्रमाणे नांदगाव नाशिक बागलाण इगतपुरी चांदवड सिन्नर निफाड येवले कळवण पेठ सुरगाणा मालेगाव सह जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असते अनेक ठिकाणी शाळांच्या भिंतीलागून शासकीय कार्यालयांच्या भिंतीला आडून ग्रामपंचायतीच्या भिंतीलागून किंवा घराघरामधून देखील अवैद्य दारू विक्री बिंनधासपणे चालत असते त्यामुळे अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले असून कुटुंब उध्वस्त होत आहे यावर कठोर उपाय योजनांची गरज आहे.
