
ओझर ( प्रतिनिधी) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माधवराव बोरस्ते विद्यालयात जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. यावर्षीची योगादिनाची थीम ‘एक पृथ्वी एक स्वास्थ्य’ ही होती. यामुळे प्रत्येकाची जीवन हे अतिशय महत्त्वाचे असून आपण प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे आवाहन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी विद्यार्थ्यांना केले. यानिमित्त ओझरचे योगगुरु संतोष सोनवणे यांनी विद्यार्थ्यांकडून अनेक प्रात्यक्षिके करून घेतली. प्रारंभी सामूहिक ओमकार धून सादर करून योगा प्राणायाम भस्रीका अनुलोम-विलोम अशी विविध आसने प्रात्यक्षिकांद्वारे घेण्यात आली. ‘आरोग्य हीच संपत्ती’ यावर संतोष सोनवणे यांनी आरोग्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्यापक सोपान वाटपाडे पर्यवेक्षक दशरथ शिंदे प्रभाकर लवांड मनोरमा सोमवंशी उज्वला जाधव उपस्थित होत्या.योग दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनी योग प्रात्यक्षिकांचे ज्ञान मिळविले. यावेळी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या हस्ते योगगुरु संतोष सोनवणे, ऋग्वेद सोनवणे यांचा योग दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
