
मुळाणे (सटाणा) (प्रतिनिधी )मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय मुळाणे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.डी.पगारे व विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक यतिन शेवाळे व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गायन करुन करण्यात आली.प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.डी.पगारे यांनी जागतिक योग दिवस, या वर्षीची थीम *”yoga for one earth one health”* याविषयी माहिती दिली. त्यानंतर क्रीडा शिक्षक श्री.आबा अहिरे यांनी योग प्रार्थनेने सुरुवात करून योगसाधनेचे प्रात्यक्षिक करून घेतले.यात त्यानी योगसाधनेचे महत्व व गरज हेही विशद केले . याप्रसंगी सर्व शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी ,पालक या सर्वांनी योगसाधनेत सहभाग घेतला .त्यानंतर शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .कार्यक्रमासाठी विद्यालयाचे कलाशिक्षिका श्रीम.एल.एस.बच्छाव यांनी सुंदर फलकलेखन केले.सूत्रसंचालन श्री.जी.एन.वाघ यांनी व आभार श्रीम.डि.बी सावकार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व
