
राहुरी: (प्रतिनिधी ) राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वर्ग एक सुधाकर श्रीरंग मुंडे (वय ५७), रा. केशव कुंज रोड, श्रीराम चौक, अहिल्यानगर यांना दहा हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर पथकाने २० जून २०२५ रोजी रंगेहात पकडले. सेवानिवृत्त ग्रामसेवक व ५८ जिल्हा अहिल्यानगर हे सेवेत असताना त्यांच्यावर गटविकास अधिकारी राहुरी यांच्या अहवालावरून निलंबनाची कारवाई झाली होती सेवानिवृत्तीनंतर दोषारोप पत्राचा अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने पाठविण्यासाठी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी दहा हजाराची लाचेची मागणी केली होती. आरोपी सुधाकर मुंडे यांनी लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली आहे. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे ला.प्र.वि अहिल्यानगर, पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रक, चालक अरुण शेख माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली वरील पथकाने ही कारवाई केली.
