
विवेक लागू यांचा अल्पपरिचय.
जन्म.१५ ऑक्टोबर १९५३विवेक यांनी विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले होते.मराठी सोबतच हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं होतं. या व्यतिरिक्त ‘रानभूल’, ‘सूर्यास्त’, ‘अबोल झाली सतार’ या नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. आपल्या उत्तम अभिनयासोबत ‘चल आटप लवकर’, ‘प्रकरण दुसरे’, ‘सर्वस्वी तुझीच’ या नाटकांचं लिखाणही त्यांनी केलं होतं. विवेक लागू हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. या दोघांची भेट १९७६ साली एका बँकेत काम करत असताना झाली होती. रंगभूमी आणि अभिनयाची समान आवड यामुळे त्यांच्यात जवळीक वाढली. हे नातं पुढे प्रेमात आणि मग १९७८ मध्ये विवाहात परावर्तित झाले. मात्र, काही वर्षांनी वैयक्तिक मतभेदांमुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तरीही त्यांनी एकमेकांबद्दलचा आदर आणि सलोखा कायम ठेवला. रीमा लागू यांच्या २०१७ मध्ये झालेल्या अकाली निधनापर्यंत ही स्नेहसंबंध टिकून होते.या दांपत्याची मुलगी मृण्मयी लागू वैकुळ या चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेल्या लेखिका आणि दिग्दर्शिका आहे. ‘थप्पड’ आणि ‘स्कूप’ यांसारख्या समीक्षात्मक दृष्टिकोनातून गाजलेल्या प्रकल्पांची ती लेखिका असून तिने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.विवेक लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
संकलन.*#संजीव_वेलणकर पुणे.*९४२२३०१७३३संदर्भ :- इंटरनेटही व इतर पोस्ट त्यांच्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
