
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९४२ वा दिवस सफलता प्राप्त करण्याकरिता जबरदस्त इच्छाशक्तीची, प्रचंड आणि अविरत प्रयत्नांची आवश्यकता आहे. ‘मी महासागर पिऊन टाकीन. माझ्या इच्छेने पर्वतांचे चूर्णविचूर्ण होऊन जाईल’ प्रयत्नशील माणूस असेच म्हणत असतो. अशाच प्रकारचे बल असू द्या, अशाच प्रकारची अदम्य इच्छाशक्ती असू द्या. कठोर परिश्रम करा, विश्वब्रम्हांडातील समस्त शक्ती आपल्यात आधीपासूनच विद्यमान आहे. तुमच्या शरीरात केवढे ओज, केवढे तेज, केवढे चैतन्य, केवढ्या शक्ती अव्यक्त रुपात विराजमान आहेत. मग तुमच्या प्रयत्नांवरच तुमची ध्येयप्राप्ती निश्चित आहे. *स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर ३० जेष्ठ शके १९४७*
★ जेष्ठ वद्य /कृष्ण ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. २० जून २०२५
★ दक्षिणायन प्रारंभ
★ १८६९ किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्मदिन.★ १८८७ भारतातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक (व्हिक्टोरिया टर्मिनस) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुरु झाले.
★ १९८७ जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक डॉ. सलीम अली यांचा स्मृतीदिन
★ जागतिक शरणार्थी दिन.
