
नासाका विद्यालयातील विशेष सत्कार सोहळ्याप्रसंगी गुणवंतांसह ज्येष्ठ कामगार नेते प्रशांत कापसे, कवी शरद आडके, संदीप आडके, मुख्याध्यापक अरुण पगार यांच्यासह पालक आणि शिक्षक-कर्मचारी.
नाशिकरोड:-(प्रतिनिधी )प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात दहावीची परीक्षा त्याच्या भविष्याला दिशा देत असते. या परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणे हे प्रत्येक शाळेचे कर्तव्य आहे. कारण अशा गुणवंतांचा गौरव म्हणजे शाळेचा खरा सन्मान असतो, असे उदगार ज्येष्ठ कामगार नेते प्रशांत कापसे यांनी काढले. पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या विशेष सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. मंचावर सुप्रसिद्ध कवी आणि नानेगावच्या श्रीमंत श्री नर्सरीचे संचालक शरद आडके, मुख्याध्यापक अरुण पगार, सामाजिक कार्यकर्ते संदीप आडके यांच्यासह गुणवंत विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सेमी मराठी माध्यमात गुणानुक्रमे प्रथम ते पाचवा क्रमांकप्राप्त प्रथम वेदिका भाऊसाहेब शिंदे, तनिष्का संजय आडके, गणेश मनोहर सानप, सुजल संजय शिंदे, सारंग नवनाथ मुंजे यांच्यासह मराठी माध्यमातून यशस्वी झालेल्या ऋतुजा विजय आडके, श्रावणी संतोष चौधरी, गायत्री सोमनाथ कांगणे, ऋतुजा सोमनाथ ठुबे, गणेश रामदास विंचू यांना सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन तर सांस्कृतिक विभागप्रमुख कैलास लहांगे यांनी आभार मानले.
