
मनमाड ( प्रतिनिधी ) मनमाड शहर काँग्रेसचे धरणे आंदोलन नगरपालिकेच्या विरोधातील यशस्वी झाले एकूण महत्त्वाच्या नऊ मागण्यांपैकी पाच मागण्या त्वरित मान्य झाल्या उर्वरित मागण्यांचा कारवाई करण्यासाठी मुख्य अधिकारी चौधरी यांनी कारवाई करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले व स्वतः लक्ष घालून सर्व मागण्यांचा पाठपुरावा ते करणार आहेत सदर आंदोलन शहर काँग्रेसचे अध्यक्ष नाजीम शेख यांच्या नेतृत्वाखाली सर्व संघटना व राजकीय पक्षांना एकत्र घेऊन करण्यात आले उपस्थिती जिल्हा नेते भीमराव जेजुरे नगरसेवक संजय निकम अडवोकेट फरीदा मिठाईवाला अडवोकेट वाल्मीक जगताप अजय खरोटे अन्सार शाहा जाहीद इंगळे सर हिरामण कुस्माडे कांबळे बाबूजी भाले साहेब काँग्रेसचे पदाधिकारी व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर आंदोलनात सहभागी झाले होते
