
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९४१ वा दिवस दोन वेगवेगळे मानववंश एकत्र येऊन एकमेकात मिसळतात, एकजीव होतात व त्या दोघांतून एक वेगळा बलसंपन्न असा मानववंश उदयास येतो. हा नवीन मानववंश स्वतःला संमिश्रणापासून अलिप्त राखण्याचा प्रयत्न करतो व अशाप्रकारे जातिसंस्थेला सुरुवात होते. सफरचंदाचे उदाहरण घ्या. सफरचंदाच्या एका जातीचे दुसऱ्या जातीवर कलम करून सफरचंदाची उत्तम जात तयार करण्यात येते. परंतु एकदा अशी जात निर्माण झाली की आपण ती पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २९ जेष्ठ शके १९४७*
★ जेष्ठ वद्य /कृष्ण ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. १९ जून २०२५
★ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखीचे प्रस्थान, आळंदी
★ १९६६ महाराष्ट्रात, मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे यांनी ‘शिवसेना’ या राजकीय पक्षाची स्थापना केली.
★ १९७० काँग्रेस पक्षाचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा जन्मदिन.
★ १९८१ भारताच्या अॅपल उपग्रहाचे प्रेक्षपण
★ जागतिक सांत्वन दिन…
