
सिन्नर (प्रतिनिधी ) तिबेटियन असोसिएशनच्या अध्यक्ष बुद्ध वासी ताशी डोलमा यांची दिनांक 12/6 /2025 रोजी त्यांच्या गावी मूडगुड जिल्हा करवार राज्य कर्नाटक येथे निधन झाले त्या कुशल समाजसेविका होत्या स्वतःच्या परिवारासह नाशिक येथील सर्व तिबेटियन बांधवांना सांभाळून बौद्ध धर्माच्या चळवळीत अग्रेसर होत्या त्यांच्या निधनाने या सर्व परिवारात पोकली निर्माण झाली ,

ती कशानेही भरून निघणार नाही, बौद्ध धर्मा विषयी त्यांची चळवळ एक आदर्श होती म्हणून दिनांक 19 /6/ 2025 रोजी त्यांचा आदरांजली कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व विवेस या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सदरप्रसंगी सूत्रसंचालन: श्रीकांत जाधव नगरसेवक सिन्नर तसेच प्रस्ताविक जगन्नाथ कटार नवरे त्याचबरोबर आभार ॳॅड.संतोष गोरे यांनी मानले व डी एम शिरसाट यांच्या वतीने सामुहीक बुद्ध वंदना घेण्यात आली .

त्याचबरोबर अध्यक्षीय मनोगत महामित्र दत्ता वायचळे यांनी व्यक्त केले त्यावेळी अनेक बौद्ध धर्मिय नागरिक उपस्थित होते राजेंद्र दिवे शांताराम जगताप दिलीप आहेर लक्ष्मण माळी योगेश दोडके कैलास शिंदे कैलास गायकवाड उल्हास जगताप वसंत जाधव बाळा कुंदेवाडीकर विनोद दोडके भाऊसाहेब दोडके कैलास शिंदे असे अनेक बौद्ध धर्मिय उपस्थित होते
