
नांदगाव (प्रतिनिधी ) नांदगाव शहरातील अहिल्यादेवी नगर ( हमालवाडा) व कैलासनगर,आनंदनगर या परिसरातील काही स्ट्रीट लाईट हे लागत नसून त्यामुळे खूप अंधार हा परिसरात राहत असून त्यामुळे चोरीचे प्रमाण वाढत आहे . तसेच वरील भागात / प्रभागात औषध फवारणी करण्यात यावा कारण विविध प्रकारच्या डासाने लोंकाना त्रास होत आहे. तसेच परिसरात गवत खूप असल्या कारणाने रात्री अपरात्री साप निघत असता तरी तात्काळ यावर योग्य ती कारवाई करावी ही विनंती*. *त्याप्रसंगी बिरु शिंदे, शरद आयनोर, गंगाधर कर्नर नाना चव्हाण, विनायक भावसार, विश्वास वाघ, रवि शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
