
मनमाड, नाशिक ( प्रतिनिधी) मनमाड शहराचा एक निष्ठावान आणि धाडसी गोरक्षक, सतीश भाऊ परदेशी यांची महाराष्ट्र शासनाच्या प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समिती (मा. उच्च न्यायालय, मुंबई) व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त निर्णयाने ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नेमणूक संपूर्ण नाशिक जिल्ह्याकरिता करण्यात आली असून त्यांचा कार्यकक्षा आता संपूर्ण महाराष्ट्रभर राहणार आहे.सतीश भाऊ परदेशी हे मागील २५-३० वर्षांपासून प्राणी संरक्षण आणि सामाजिक कार्यात अहोरात्र कार्यरत आहेत. अनेकवेळा त्यांनी मध्यरात्री स्वतः जीव धोक्यात घालून गोरक्षणासाठी मोठे धाडस दाखवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो गोवंश प्राण्यांना कत्तलीपासून वाचवून विविध गोशाळांमध्ये सुखरूप दाखल करण्यात आले आहे.त्यांच्या या प्रेरणादायी कार्यास मालेगावचे प्रसिद्ध गोरक्षक मच्छिंद्र भाऊ शिर्के, गणेश महाराज गोसावी, सुभाष दादा मालू यांचे सतत मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्यातील सेवाभाव, निष्ठा आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती लक्षात घेऊनच शासनाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.आज मनमाड शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील गोरक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून सतीश भाऊ परदेशी यांचा जल्लोषात सन्मान केला जात आहे. त्यांच्या या नेमणुकीने संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे.—सतीश भाऊ परदेशी यांच्या कार्याची एक झलक :२५+ वर्षांचा प्राणी कल्याणातील अनुभवशेकडो गोवंश प्राण्यांना वाचवलेसामाजिक कार्यात सक्रीय योगदानगोरक्षक समुदायात विशेष आदरस्थान पुढील वाटचालीस भगव्या शुभेच्छाशुभेच्छुक… श्री संजय दराडे शिवसेना उपशहर प्रमुख मनमाड
