
लासलगाव ( प्रतिनिधी): नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर फ्री पास योजनेअंतर्गत मोफत पास वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून लासलगाव आगार व्यवस्थापक श्रीमती सविता काळे व त्यांचे सहकारी नितीन बोठे, शैलेंद्र बागुल व इतर सहकारी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक उज्वल शेलार, किशोर गोसावी तसेच सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिवहन समिती प्रमुख प्रभाकर गांगुर्डे यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आगार व्यवस्थापक श्रीमती सविता काळे यांचे महाविद्यालयाचे नक्षत्र व पुष्पगुच्छ देऊन श्रीमती दीपाली कुलकर्णी यांनी स्वागत व सत्कार केला. या योजनेअंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयाच्या एकूण 201 विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतला.कार्यक्रमाप्रसंगी आगार व्यवस्थापक श्रीमती सविता काळे यांनी विद्यार्थिनींच्या बसच्या संदर्भात समस्या जाणून घेतल्या व त्या सोडवण्याचे त्यांनी आश्वासित केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, डॉ.सोमनाथ आरोटे यांचे मार्गदर्शन लाभले.
