
न्यायडोंगरी (प्रतिनिधी) माजी मुख्यमंत्री व विद्यमान उप मुख्यमंत्री ना एकनाथरावजी शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेली “माझी शाळा सुंदर शाळा” या स्पर्धेत नांदगाव तालुक्यातील “नायडोंगरी”येथील केंद्रशाळेने नांदगाव तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून न्यायडोंगरी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.* जिल्हा परिषदेच्या शाळांचा सर्वांगीण विकास व शैक्षणिक गुणवत्ता वाढावी या उद्देशाने माजी मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांनी सुरु केलेल्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या स्पर्धेत नायडोंगरी केंद्रशाळेने भाग घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत शाळेमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलावर शिक्कामोर्तब केला आहे.सन २०२४/२०३५ या शैक्षणिक वर्षांत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवायचेच हे ध्येय उराशी बाळगून शाळा सुरू झाल्याचे पहिल्या दिवसापासून मुख्याध्यापक व सर्व शिक्षक झपाटून कामाला लागले होते. त्यांना सक्रिय साथ दिली शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक वर्ग आणि ग्रामपालिकेने तर प्रोत्साहन व मार्गदर्शन गट शिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती नंदा सोळुंके, केंद्र प्रमुख राजेंद्र पाटील यांनी दिल्याने या शाळेने हे सिद्ध केले की एखादे ध्येय ठरवले आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी ध्येयवेडे होऊन काम केले तर यश मिळतेच. आज जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असताना या शाळेचे हे यश प्रेरणा देणारे आहे.ग्रेड पात्र मुख्याध्यापक पद रिक्त , बहुसंख्य शिक्षिका महिला असताना हे यश मिळवूनच दाखवु असा विश्वास मुख्याध्यापिका वर्षा भामरे यांनी सर्व शिक्षकांमध्ये रुजवला आणि सर्वच जोमाने कामाला लागले शालेय आवारात पेव्हर ब्लॉक, परसबाग,रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडूळ खत प्रकल्पनिर्मिती, शुद्ध पिण्याचे पाणी या भौतिक सुविधांसह गुणवत्ता वाढीसाठी स्मार्ट बोर्ड व वाय फायने सुसज्ज डिजिटल शाळा, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इतर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या सर्व सुविधा मुळेच या पूर्वी ही शाळा जि.प.आदर्श शाळा म्हणून तालुक्यात पहिली आलेली आहे. शाळेच्या या उत्तुंग यशामुळे अधिकारी वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती व पालकवर्गाने समाधान व्यक्त केले.आहे .
