
नाशिक: ( वार्ताहर )आज जिल्हा परिषद शाळा विल्होळी येथे शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम इयत्ता पहिलीत दाखल नवागतांचे स्वागत करण्यात येऊन मिनी ट्रॅक्टर मधून सर्व मुलांची मिरवणूक काढण्यासाठी गाडी सजविण्यात आली व गावातून मिरवणूक काढण्यात आली. नवागतांचे पहिले पाऊल घेण्यात येऊन त्यांचे औक्षणही करण्यात आले. यानंतर इयत्ता 1 ते 7 च्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे व मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. खासदार राजाभाऊ वाजेच्या निधीतून ऑनलाईन दाखले सॉफ्टवेअर चे उदघाटन करण्यात आले तसेच दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना गोड शिरा तसेच मसाला भात चे जेवण देण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,संजय गायकवाड आणि सर्व सदस्य,गावचे सरपंच सौ.जानकाबाई चव्हाण भास्कर भाऊ थोरात उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, माजी सभापती रत्नाकर चुंभळे गटविकास अधिकारी सोनिया नाकोडे मॅडम, गटशिक्षणाधिकारी मंदाकिनी देवकर, विस्तार अधिकारी मोहन रणदिवे सुनील दराडे, उमरे साहेब ग्रामविस्तार अधिकारी जाधव ग्रामपंचायत सदस्या श्रीमती कदम ताई रुपवते ताई दैनिक पुढारीचे वार्ताहर बाळासाहेब वाजे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी मुख्याध्यापक नितीन पवार सतीश लाड रंजन भावसार सुवर्णा पवार आशालता फलके शैलजा सामुद्रे, संगिता नागपुरे शीतल शिंदे आशा चौधरी रुपाली शिंदे पौर्णिमा थोरात वारुंगसे मॅडम आणि पालक वर्ग यांनी प्रयत्न केले.
