
सिन्नर (प्रतिनिधी )साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बारागाव पिंपरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील उपप्राचार्य मा. श्री. दिलीप संतुजी उगले यांची 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेच्या सेवापूर्ती गौरव सोहळा निमित्ताने श्री. दत्तात्रेय गोसावी (सामाजिक कार्यकर्ते बारागाव पिंपरी )तसेच श्री. दत्ताभाऊ वायचळे( मा.नायब तहसीलदार सिन्नर) व श्री. वसंत शहाणे ( मा. उपसरपंच बारागाव पिंपरी) यांनी सरांच्या सेवापूर्ती गौरव सोहळा निमित्ताने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार न करता दैनिक लोकमत, दिव्य मराठी, सकाळ गावकरी ,देशदूत ,पुण्यनगरी, पुढारी इत्यादी एकूण शंभर वर्तमानपत्राचे अंकाचे कार्यक्रमाच्या ठिकाणी मान्यवर, शिक्षक ,ग्रामस्थ यांना वर्तमानपत्राचे वाटप करण्यात आले. कारण कोरोनाच्या महामारीच्या काळापासून ग्रामीण भागात वर्तमानपत्र वाचन कमी झाले असून यामुळे ग्रामीण भागातील लोकांना वर्तमानपत्र वाचनाची आवड व्हावी तसेच प्रत्येक मुला मुलींकडे मोबाईल असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा बघण्याचा वापर केला जातो यामुळे वर्तमानपत्र वाचण्याची संख्या कमी होत चालली आहे सर्वांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने वर्तमानपत्राचे साने गुरुजी शिक्षक प्रसारक मंडळ न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बारागाव पिंपरी येथे वर्तमान अंकाची मोफत वाटप करण्यात आले.
