
मुळडोंगरी(प्रतिनिधी ).श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय मुळ डोंगरी येथे 16जुन 2025 वार सोमवार शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सवात स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यालयाच्या प्रवेश द्वारापर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून करण्यात आले .याप्रसंगी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री. एस.जी राठोड साहेब तसेच सचिव सिद्धांत दादा राठोड विद्यालयातील माननीय मुख्याध्यापिका सौ बोरसे मॅडम व गावच्या प्रथम नागरिक सरपंच अध्यक्ष जनाताई पवार यांच्या हस्ते औक्षण करून विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व पुस्तके वाटप करण्यात आली

याप्रसंगी नियमित परिपाठ, प्रार्थना, राष्ट्रगीत, राज्य गीत करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंदात करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री एस. जी. राठोड साहेब आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बोरसे मॅडम यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या बाल उद्यानाचे उदघाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ बोरसे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या .याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
