
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९३९ वा दिवस थोर लोकांनी महान त्याग करावा व सामान्य जनांनी त्याची फळे उपभोगावीत या गोष्टीला साऱ्या जगाचा इतिहास साक्ष देईल. आपल्याच वैयक्तिक मुक्तीकामनेने तुम्ही जर सर्वस्वाचा त्याग केला तर तो कसला त्याग? जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या मुक्तीवर देखील पाणी सोडण्याची तुमची तयारी आहे काय? तुम्ही स्वतः ब्रह्मस्वरूप आहात हे लक्षात घ्या. तुमच्या ठिकाणी जर ज्वलंत श्रद्धा असेल, सर्वविजय प्रेम असेल, सर्वशक्तिमान पवित्र मन असेल तर अल्पकाळातच तुम्हाला यश मिळेल याची खात्री बाळगा.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २७ जेष्ठ शके १९४७
★ जेष्ठ वद्य /कृष्ण ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. १७ जून २०२५
★ १६७४ राजमाता जिजाऊ माँसाहेब स्मृतीदिन (रायगडाच्या पायथ्याशी ‘पाचाड’)
★ १८९५ दैनिक ‘केसरी’चे पहिले संपादक, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सदस्य, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, लोकमान्य टिळकांचे सहकारी गोपाळ गणेश आगरकर यांचा स्मृतीदिन.
