
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात नवगत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले त्याप्रसंगी प्राचार्य रायभान दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी व आदी
कसबे सुकेणे (प्रतिनिधी) – मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता पहिली, पाचवी व इतर नवीन प्रवेश घेतलेल्या नवगतांचे उत्साहात स्वागत करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते व्यासपीठावर उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक राजेश खताळ, अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल मोगल, कॉलेज विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा सचिन भंडारे,स्कूल कमिटीचे सदस्य व पालक उपस्थित होते सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित नवगतांचे गुलाब पुष्प व शासनाच्या वतीने दिली जाणारी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करत त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी विद्यालयात रांगोळी, आकर्षक फलक लेखन, प्रवेशोत्सव सेल्फी पॉईंट याद्वारे विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेशाचा आनंद घेतला विद्यार्थ्यांना गोड शिरा व मसालेभात यांचे मिस्टन्न भोजन देण्यात आले याप्रसंगी प्राचार्य दवंगे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यार्थी व पालकांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन ग्रंथपाल सोमनाथ मत्सागर यांनी तर आभार प्रा दिनकर रसाळ यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
