
न्यायडोंगरी (प्रतिनिधी)१६ जून २०२५श्री शनैश्वर सेवाभावी संस्था, न्यायडोंगरी संचलित,*स्व. अण्णासो गंगाधर शिवराय आहेर आदिवासी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, न्यायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक* येथे आज दिनांक १६ जून २०२५ रोजी शालेय प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमावेळी न्यायडोंगरी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मान. श्री.जी.एम.पवार साहेब उपस्थित होते आगमनप्रसंगी पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.कार्यक्रमात पालकांना शाळेतील विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व खेळांची उपलब्ध सुविधा यांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती संस्थेचे सरचिटणीस मा. अनिलदादा आहेर व खजिनदार मा. दर्शनभाऊ आहेर यांनी दिली.

यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळा कशी प्रयत्नशील आहे, याचे दर्शन घडवणाऱ्या चित्रफितींचे सादरीकरण देखील करण्यात आले. तसेच विविध उपक्रम घेण्यात आले त्यात शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन, सेल्फी पॉईंट, विद्यार्थी औक्षण इत्यादी उपक्रम घेण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

