
मखमलाबाद विद्यालयात सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वाटप व प्रवेशोत्सव स्वागत करतांना मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे व सर्व मान्यवर, प्राचार्य,उपप्राचार्या,पर्यवेक्षक, सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी
मखमलाबाद { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वाटप व नविन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे,उच्च माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष पंडितराव पिंगळे,स्कूल कमिटी सदस्य बाळासाहेब पिंगळे,हरिश्चंद्र पिंगळे,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य विमल रायते,पर्यवेक्षक सुनील पाटील, ग्रंथपाल सुभाष कोल्हे यांच्या शुभहस्ते इयत्ता ५ वी ते ८ वी च्या सर्व विद्यार्थांना शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पुस्तके वाटप करण्यात आली.यासाठी ग्रंथपाल सुभाष कोल्हे यांचे नियोजन व सहकार्य लाभले.तसेच इयत्ता ५ वी व नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे वर्गशिक्षकांनी औक्षण केले. तसेच त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.शालेय परिसरात रांगोळी,फुलांच्या माळा,फुगे तसेच सेल्फी पॉईंट तयार करून सजावट करण्यात आली होती.या सजावटीसाठी सर्व शालेय परिवाराने परिश्रम घेतले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

