
नाशिक (प्रतिनिधी )टप्पा अनुदान संघर्ष समितीचा आझाद मैदानावर उपोषणाला इशारा…..14 ऑक्टोबर 2024 शासन निर्णय अंमलबजावणी व इतर शैक्षणिक विषयांवर बैठकीचे आयोजन क्रांतिवीर व्ही.एन. नाईक महाविद्यालयाच्या फार्मसी कॉलेजमध्ये बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.करण्यात आले होते,त्यावेळी ते बोलत होते . शिक्षकांच्या प्रत्येक न्याय लढाईत मी नेहमीच तुमचा सोबत असून तुम्ही कधीही आवाज द्या असे आश्वासित केले .अनेक शिक्षकांनी शाळा अनुदानावर येण्यापूर्वीच शिक्षक निवृत्त झाले असून शेतकऱ्यांच्या नंतर आत्महत्या करण्या- या शिक्षकांना अनेकांची संख्या असल्याने आपल्या शुभेच्छा मनोगत तीव्र भावना व्यक्त केल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे होते.यावेळी उत्तर महाराष्ट्रातून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, शिक्षक परिषद, जुनी पेन्शन संघटना, टि. डी. एफ. ,शिक्षक भारती व टप्पा अनुदान संघर्ष समिती, समन्वय समिती च्या विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. सर्वात प्रथम राज्यभर अनुदान टप्प्याची वाट पाहत असलेल्या शिक्षकांच्या वेतनासाठी आर्थिक निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्याबाबत राज्यातील ७ शिक्षक आमदार व ७ पदवीधर आमदार मंगळवारी दुपारी दोन वाजता शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांच्या दालनामध्ये एकत्र येऊन शिक्षण मंत्री अर्थमंत्री व मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार आहेत .त्याचबरोबर राज्यभर स्थानिक आमदारांच्या घरावर टप्प्यावरचे शिक्षकांनी एकत्र येऊन त्यांना निवेदन देण्याचे कार्यक्रम ठरवण्यात आला. त्याचबरोबर वरीष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणामध्ये अन्याय झालेल्या व फी भरूनही प्रशिक्षण पूर्ण न करू शकलेल्या शिक्षकांच्या बाबतीत शासनाची आकसपूर्ण भूमिका बदलण्याबाबत व त्या शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होणे बाबत मागणी शिक्षकांच्या वतीने करण्यात आली. तसेच तांत्रिक माध्यमिक शाळांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विनाअनुदानित मान्यता बाबतीमध्ये ही सभेमध्ये विषय मांडला असता तांत्रिक सहाय्यक संचालकांची याबाबतीत स्वतः आमदार चर्चा करणार आहेत. यावेळी शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये प्रलंबित असलेल्या शालार्थ आय.डी. व इतर मान्यतांबाबत मंगळवारी निर्णय होईल असे मा. शिक्षण उपसंचालक B B चव्हाण साहेबांनी दूरध्वनी वरून आमदारांना सांगितले. तसेच उच्च प्राथमिक विभागामधील कला , क्रीडा व कार्यानुभव विषयाच्या शिक्षकांना घड्याळी तासिका नुसार वेतन देण्याबाबत ५ जून २०२५ चा शासन निर्णय हा कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांवर अन्याय असून तो रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. . राज्यातील विनाअनुदानित तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णय नुसार पुढील वाढीव 20 % वेतन अनुदान टप्पा येत्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करून निधी वितरीत करावा ह्या अपेक्षेने राज्यातील 60 हजाराच्या वर शिक्षक बांधव चातकाप्रमाणे शासनाकडून आस लावून बसलेले आहेत. यासाठी आझाद मैदान मुंबई येथे मागणीसाठी 5 जून पासून कृती समितीचे आंदोलन सुरू आहे. तसेच 18 जून तारखेपासून शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन होणार आहे. यासाठीच नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा.आ.किशोरभाऊ दराडे हे सतत प्रयत्नशील आहेत.

तसेच मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करीत आहेत. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात निधी उपलब्ध होऊन 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाचे अनुपालन व्हावे म्हणून नाशिक विभागातील शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी एकत्र येऊन रणनीती, ठरवण्यात आली. त्यामध्ये संस्थाचालक संघटनेचा पाठिंबा घेऊन राज्यभर आंदोलन करण्याबाबत एक मत झाले. यासाठी एक शिष्ट मंडळ लवकरच संस्था चालकांची भेट घेऊन पुढील आंदोलनाबाबत चर्चा करणार आहे. यावेळी व्यासपीठावर शिक्षक सेनेचे संजय चव्हाण, मधुकर वाघ ,मोहन चकोर ,विजय बडे, भरत भांबरे ,शंकर सांगळे. कलीम अंसारी, योगेश मोजाड ,राजेंद्र सोमवंशी ,हेमंत पाटील ,अनिल परदेशी ,निलेश गांगुर्डे ,कला व क्रीडा कार्यानुभवचे अनेक शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर वाघ यांनी केले तर आभार मोहन चकोर यांनी मानले.
