
मांडवड (प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित स्व. शरद आण्णा आहेर जनता विद्यालय, मांडवड विद्यालयांमध्ये “शालेय प्रवेशोत्सव” सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.आज दिनांक (16) रोजी शैक्षणिक वर्ष 2025_26 चा पहिला दिवस विद्यालयांमध्ये प्रवेशोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मांडवड गावचे तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रसेन आबा आहेर हे होते. यावेळी विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तक तसेच गुलाबपुष्प व शालेय पोषण आहार योजने अंतर्गत मिष्टांत भोजन देण्यात आले. व पहिला दिवस विद्यार्थ्यांचा गोड करण्यात आला. सदर कार्यक्रमाप्रसंगी शालेय स्कूल कमिटी चे अध्यक्ष प्रशांत भाऊ आहेर, शिक्षणतज्ञ अजित आहेर, गावातील प्रतिष्ठित नागरिक जिल्हा परिषद सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब मोहिते, उपस्थित होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे नवनियुक्त मुख्याध्यापक थेटे एस. जी. यांचाही विद्यालया तर्फे स्वागत करण्यात आले. आपल्या भाषणातून मुख्याध्यापक थेटे यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळेच्या भौतिक तसेच येणाऱ्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी शाळा तत्पर असेल तसेच पालक शिक्षक व विद्यार्थी यांच्या एकूण सहकार्याने शाळेची प्रगती करू असे सांगून उपस्थित त्यांना अस्वस्थ केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक हेमंत परदेशी यांनी केले. तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक कवडे एस. एस.यांनी केले.
