
मांडवड (प्रतिनिधी)
उन्हाळी सुट्टीनंतर महाराष्ट्रातील सर्व शाळा पुन्हा भरल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद शाळा मांडवड यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात करण्यात आले. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली. इयत्ता पहिली ला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचे विशेष स्वागत करताना. शालेय मुख्याध्यापक राजेंद्र काकळीज व शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष श्रीमती. शीतल सावळ व ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. या निमित्ताने शालेय परिसराची सजावट करण्यात आली होती.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शितल सावळ जेष्ठ नागरिक सुखदेव थेटे, पोपट वायशे, मनोज गरुड,आदीं सह शालेय शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
