
.पिंपरखेड(प्रतिनिधी )- सोमवार दि. १६ जून २०२५कै.पुंडलिक पांडूरंग मवाळ विद्यालयात आज नवागतांना पाहुण्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. आज शैक्षणिक वर्षांचा पहिलाच दिवस, इयत्ता पाचवीला आज अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. अशा नवागत विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल बोरसे, मुख्याध्यापक काशिनाथ गवळी, पालक गोपाळ चव्हाण, भाऊसो. संदीप मवाळ, शिक्षक संजय कांदळकर, श्रीमती अलका शिंदे, कैलास पठाडे, लक्ष्मण जाधव, उत्तम सोनवणे, आबासाहेब सोनवणे आदींच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच ५वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना नवीन मोफत पाठय़पुस्तके वाटप करण्यात आले.
