
लोहशिंगवे (प्रतिनिधी ) सोमवार दि 16/06/2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा -लोहशिंगवे येथे शाळा प्रवेश उत्सव निमित्ताने इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थांची बैल गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, चॉकलेट,फुगे देऊन स्वागत करण्यात आले.

सदर प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सानप व इतर सदस्य यांचे हस्ते मोफत शालेय गणवेश, मोफत पाठयपुस्तके वाटप करण्यात आली. शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक श्री बाबुलाल ठोंबरे सर यांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, गावातील नागरिक यांचे स्वागत केले. श्री मांगीलाल जाधव यांनी आभार मानले.

या प्रसंगी शाळेतील शिक्षक श्री संदीप पाटील सर, श्री मनीलाल जगताप श्री तोलमारे सर, श्री लोटे सर, श्री पाटील सर,मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी श्रीमती हेंबाडे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
