
सायखेडा (प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सायखेडा येथे नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ नवागतांच्या स्वागताने उत्साहात साजरे करण्यात आले .” ही आवडते मज मनापासून शाळा ,लाविते लळा जसा माऊली बाळा ” या उक्तीप्रमाणे नवीन शालेय जीवनात पदार्पण करणारे अर्थात इयत्ता ५ वी त दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात विद्यालयात विद्यार्थ्यांना आणण्यात आले.

विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शालेय परिपाठ व राज्यगीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक शिवाजी आप्पा गडाख होते.याप्रसंगी नवीन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मोबाईल व्यसनांपासून दूर रहा असा संदेश आपल्या मनोगतातून त्यांनी दिला.माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष विजय कारे, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष स्वामी कमलाकांतचार्य महाराज ,व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन गावले,माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष अनिल कातकाडे ,महाविद्यालयाचे प्राचार्य खालकर सर, मुख्याध्यापक रामदास वाजे सर ,पर्यवेक्षक के.आर.आहेर सर आदी मान्यवर उपस्थित होते.

शासनाकडून प्राप्त झालेली पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली याप्रसंगी सुंदर अशी रांगोळी, गेट सजावट, सुंदर फलकलेखन विद्यालयामध्ये करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले.
