
साकोरे (प्रतिनिधी ) सोमवार दिनांक 16 जून 2025 सोमवार, रयत शिक्षण संस्थेचे, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साकोरे (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथे नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे ज्या आदरपूर्वक आणि आत्मीयतेने स्वागत करण्यात आले, ते खरोखरच स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे.

या प्रसंगी स्कूल कमिटीचे अध्यक्ष तथा चेअरमन आदरणीय श्री. रामू काका बोरसे यांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी एक उर्जादायी आणि सन्मानाची गोष्ट होती. त्याचप्रमाणे स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य श्री.अण्णासाहेब काटकर व साकोरे गावचे सरपंच आदरणीय श्री बोरसे साहेब, श्री अहिरे साहेब तसेच गावातील इतर मान्यवर ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती स्वागत समारंभास सामूहिक आधार व सामाजिक एकात्मता लाभवणारी ठरली.गटशिक्षणाधिकारी श्री. प्रमोद चिंचोले सर यांचे मार्गदर्शन हे उपस्थित विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. तसेच प्राचार्य श्री. झाल्टे डी.एस., प्र. पर्यवेक्षक श्री भोई सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. चौधरी सर, व सर्व शिक्षक व सेवकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करून त्यांच्या शालेय जीवनाच्या सुरुवातीला सकारात्मक आणि आश्वासक वातावरण दिले.अशा स्वागत समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, शाळेबद्दल आत्मीयता वाढते आणि त्यांचे शैक्षणिक जीवन समृद्ध करण्यासाठी एक सकारात्मक पायाभूत वातावरण तयार होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चौरे सर यांनी केले व शेवटी आभार श्री. माळी सर यांनी मानले. वरील सर्व कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री. लोखंडे सर यांनी केले.
