
वसंतनगर ( प्रतिनिधी ) सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित श्री साई ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालय वसंतनगर येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री एस . जी . राठोड साहेब यांच्या हस्ते नवागतांचे स्वागत करण्यात आले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जाधव जे. एस. पर्यवेक्षक -श्री चव्हाण पी .व्ही यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व अल्पोपहार देऊन स्वागत करण्यात आले तसेच इयत्ता पाचवी वर्गात नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पुस्तक यांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक , विद्यार्थी , पालक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
