
नांदगाव (प्रतिनिधी ) नांदगाव येथील विश्राम गृह येथे होलार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार केंगार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील भाऊ जाधव, राज्य उपाध्यक्ष सुनीलजी ढोबळे, महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई शेलार व सामाजिक कार्यकर्ते रवी भाऊ माने यांच्या सर्वांच्या अध्यक्षतेखाली श्री रविभाऊ सोनवणे यांची होलार समाज नाशिक जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली… तसेच नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री राजेंद्र सोनवणे सचिव म्हणून श्री युवराज सोनवणे जिल्हा संघटक म्हणून श्री बाली सोनवणे, सोशल मीडिया प्रमुख म्हणून श्री राजेंद्र जाधव यांची देखील निवड करण्यात आली कार्यक्रमात महत्त्वाची उपस्थिती म्हणून माननीय श्री जगताप सर श्री एडवोकेट सचिनजी साळवे आणि आरपीआय पक्षातर्फे श्री महावीर जाधव व ,श्री पिंटू भाऊ सोळशे, श्री मुस्ताक भाई शेख यांनी देखील उपस्थिती लावली होती यावेळी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
