
मोरेवाडी (प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी येथे शाळेचा पहिला दिवस मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम शालेय परिसराची आमसफाई करण्यात येऊन परिसर सुशोभित करण्यात आला.शाळा प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांची प्रवेश दिंडी काढण्यात आली.शाळेतील शिक्षिका योगिता कापुरे यांनी नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करून पुस्तकदिन साजरा करण्यात आला.मोफत गणवेशाचे वितरण करण्यात आले.शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना मिठाई देण्यात आली.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सिताराम महादू काळे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे,उपाध्यक्ष नवनाथ पवार,ग्रामपंचायत सदस्य भिमबाई मोरे,शिक्षणतज्ञ अविनाश कर्नर,सर्पमित्र प्रभाकर निकुंभ,पालक रोहिदास पवार,कैलास मोरे,पांडुरंग शिंगाडे,किरण पवार,शितल ठाकरे,लताबाई मोरे,दिपाली पवार, झेल्याबाई मोरे,शिक्षिका योगिता कापुरे अंगणवाडी कार्यकर्ती सुनिता राठोड,मदतनीस छाया सानप,मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी शितल मोरे,स्वयंपाकी जिभाऊ मोरे,मुख्याध्यापक गणेश बागुल व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक बागुल सर यांनी केले,तर योगिता कापुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
