
अहिल्यानगर येथे सरपंच सेवा संघाच्या वतीने सिन्नरचे दत्ता गोसावी यांना भास्करराव पेरे यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करताना समवेत हभप जयश्रीताई तिकांडे,डॉ. श्यामसुंदर झळके,बाबासाहेब पावसे,राजेंद्र गोसावी आदी
सिन्नर (-श्यामसुंदर झळके, प्रतिनिधी)समाजात अनेकजण आपल्या कर्तुत्वाने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करतात,त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे. सरपंच सेवासंघ, महाराष्ट्राचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार उपक्रम प्रेरणादायी तसेच इतरांना ऊर्जा देणारा आहे असे गौरवोद्गार पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांनी काढले. अहिल्या नगर येथे माऊली संकुल सभागृह येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ववलनाने करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर बाबासाहेब पावसे, रोहीत पवार,हभप जयश्रीताई तिकांडे,रवी पावसे,अमोल शेवाळे,बाबाजी गुळवे,सुजाता कासार,यादव पावसे,राजेंद्र गिरी उपस्थित होते.सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी सामाजिक तसेच विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेऊन सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने” समाजभूषण सन्मान२०२५ ” पुरस्काराने भास्करराव पेरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र,सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्यामसुंदर झळके,दत्ता जोशी,राजेंद्र गोसावी,भाऊसाहेब ढेंगळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव गोरडे यांनी केले.आभार बाबासाहेब पावसे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले सरपंच,विविध क्षेत्रातील मान्यवर, पुरस्कारार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव गोरडे यांनी केले तर आभार बाबासाहेब पावसे यांनी मानले.
