
साकोरे(प्रतिनिधी )पेङकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या – माध्यमिक विद्यालय साकोरे ता नांदगाव जि नासिक विद्यालयात इयत्ता ५ वी नवीन विद्यार्थी स्वागत् करण्यात आले यावेळी प्रार्थना , परीपाठ , कुलस्वामिनी पेङकाई माता , सरस्वती पूजन मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी केले त्यानंतर इयत्ता ५ वी विद्यार्थी यांना पुस्तके , वही , पेन वाटप करण्यात आले. *संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेश पाटील सर यांनी गरीब व होतकरु इयत्ता ९ वी , १० वी विद्यार्थ्यांना पुस्तके संच भेट म्हणून दिलेत त्याबद्दल त्यांचे आभार विद्यालयाकङून माणण्यात आले.* श्रीमती पूनम बोरसे व श्री सुदर्शन सुरसे , संजय बोरसे यांनी इयत्ता ५ वी नवीन विद्यार्थी यांचे अनोख्या पध्दतीने स्वागत् केले यावेळी बोरसे व्ही पी , बोरसे ए आर , बोरसे आर बी , क्षीरसागर के एस , बोरसे आर एच , भारत बोरसे , रवी बीरसे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष , सचिव पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






