

नांदगाव ( प्रतिनिधी) राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुनिल गव्हाणे यांना नाशिक जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस यांनी एका पत्रकार द्वारे नाशिक जिल्हा पदाधिकारी यांच्या पदाचा राजीनामा पाठवला आहे. त्यामध्ये जय दिनकर पाटील जिल्हा सरचिटणीस,कल्पेश श्रीधर बोरसे जिल्हा चिटणीस, शाम हनुमंत बोरसे , तालुका उपाध्यक्ष,महेश सतिष पगार, तालुका उपाध्यक्ष,कृष्णा नितीन शेवाळे , कार्याध्यक्ष,तन्मय संतोष पाटील कार्याध्यक्ष, शिवनाथ समाधान भवर सरचिटणीस,पवन काशिनाथ जाधव , चिटणीस, नयन भरत अभंग , प्रसिद्धी प्रमुख,समर्थ केतन आहेर, संघटन आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्याकडे पाठवला आहे.
